- अन्यथा कलम १८८ नुसार होणार कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांची कोविड १९ ची तपासणी रॅपिड अँटीजेन / आरटीपीसीआर (RTPCR व Rapid Antigen test) व्दारे करुन त्याची नोंद आयसीएमआर (ICMR) पोर्टलवर करणेत येत आहे.
शहरातील काही खासगी रुग्णालये रुग्णांची नोंद आयसीएमआर (ICMR) पोर्टलवर करीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तपासणी केलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत आढळुन येत आहे.
ही चाचणी करण्यात येणाऱ्या शहरातील खाजगी रुग्णालये, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब यांनी रुग्णांची नोंद दररोज आयसीएमआर (ICMR) पोर्टलवर करावी. दवाखाना, रुग्णालय व लॅबमार्फत अशी नोंद न घेतल्याचे आढळुन आल्यास, त्यांच्यावर महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० मधील नियम-११, भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८, केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार व बॉम्बे नर्सिंग ऍ़क्ट १९४९ मधील कलम ७ व ८ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने पत्रकाद्वारे दिला आहे.