- लॉकडाऊननंतर योजनेला गती मिळणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने शहरात गुरुवार (दि.१) पासून ‘ पे अँड पार्क ‘ योजना सुरू केली आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांचा विरोध लक्षात घेऊन त्याची कठोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. तसेच, लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गेल्या ५ दिवसांत वाहनचालकांकडून ३० हजार रुपयांपेक्षा अधिकचे उत्पत्र पालिकेकडे जमा झाले आहे.
पालिकेने पार्किग पॉलिसी तयार करून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच, सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनीही विरोध केला आहे. विविध सामाजिक संघटना त्याविरोधात आहेत. अशा परिस्थितीत पालिकेने ती योजना शहरात सुरू केली. ‘ पे अॅण्ड पार्क’ ला वाहनचालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सध्या दुपारी चारनंतर लॉकडाऊन सुरू आहे. वाहनांची वर्दळ कमी झाल्याने चारनंतर प्रतिसाद कमी होतो. रविवारी (दि.४) साप्ताहिक सुटीनिमित्त शुल्क वसुली बंद होती. विरोध आणि अल्प प्रतिसादामुळे मोजक्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू आहे. गेल्या ५ दिवसांत ३० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न पालिकेस मिळाले आहे. हळूहळू वाहनचालकांचा प्रतिसाद वाढून शुल्क देण्याचा कल वाढणार आहे. परिणामी, पालिकेचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.