- शहरात लसीकरण केवळ या १६ केंद्रांवरच होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवारी (दि. ०९) रोजी ‘कोव्हॉक्सीन’ १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त पहिला डोस हा १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी स्लॉट बुकींग ओपन होईल.
सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगररुग्णालय, आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या ८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
तसेच उद्या वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे.
या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, मासुळकरकॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ, प्रेमलोक पार्क दवाखाना या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला डोस १०० व दुसरा डोस १०० या लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
वय ४५ वर्षावरील लाभार्थी यांचे लसीकरण हे केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पध्दतीने करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वय वर्षे ४५ पुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर उद्या सकाळी ८.०० वाजलेनंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.


















