- तिघांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- काळेवाडीतील तांबे शाळा परिसरात जमीन खरेदी करून फिर्यादीने आरोपींना चार लाख रुपये दिले. जमीन ताबा, साठेखत व कुलमुखत्यारपत्र फिर्यादीच्या नावे करण्यात आले.
दरम्यान एप्रिल २०१७ ते जुलै २०१७ मध्ये संतोष बधाले यांनी फिर्यादीने खरेदी केलेल्या जागेवर ताबा मारल्याचे आढळले. फिर्यादी यांनी आरोपीला विचारणा केली. फिर्यादी यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
फसवणूक केली म्हणून फिर्यादी रामकृष्ण महादेव पदमने (वय ३३, रा. पडवळनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विठ्ठल कोंडीबा जाधव (रा. तापकीरनगर, काळेवाडी), ज्ञानेश्वर गणपत नखाते (रा. नखातेनगर, रहाटणी), दत्तात्रय भाऊसाहेब कदम (रा. तांबे शाळेमागे, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















