न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- सद्यस्थितीत याठिकाणी आमचे पुनर्वसन नको. आधुनिक पद्धतीने भाजी मंडई व गाळे बांधण्यात यावेत मगच आमचे पुनर्वसन करावे. तोपर्यंत अतिक्रमण कारवाई करू नये या मागणीसाठी सांगवीत हातगाडी धारक, पथारी धारक, भाजीविक्रेते यांनी “ह’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केले.
सांगवीतील फळ, भाजीविक्रेते, हातगाडी, पथारीधारक व विक्रेत्यांचे ४×४ च्या गाळ्यांमध्ये पुनर्वसन केलं जाणार आहे. १९९९ साली जुनी सांगवी येथील मंडईत हे गाळे बांधण्यात आले. या भाजी मंडईमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. पार्किंगची, पिण्याच्या पाण्याची व लाईटची व्यवस्था नाही.
टपरी, पथारी, हतगाडी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी टपरी, पथारी, हतगाडी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे, राजू काटे, राजू प्रभु, अण्णा कराळे, गणेश वाघमारे, वामन खानापुरे, आदित्य सूर्यवंशी, प्रशांत सोनकिरे, आदी उपस्थित होते. यावेळी प्रभाग अधिकारी अभिजित हराळे यांना निवेदन देण्यात आले.
















