- चिंचवडमधील घटना; विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- अँकॅडमीमधील संगणक प्रणालीचा पासवर्ड चोरला व त्यातील डेटाबेसद्वारे संगणकाचा अक्सेस घेतला. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेरफार केला. तीन विद्यार्थ्यांच्या नावाने आलेली शिष्यवृत्ती दोघांच्या बँक खात्यावर टाकली.
संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. २८ हजार ९३७ रुपयांच्या शिष्यवृत्तीची चोरी झाली. ही घटना २४ एप्रिल ते १५ मे दरम्यान आयआयएमएस बिल्डिंग, चिंचवड येथे घडली.
प्रसाद प्रभाकर शाळिग्राम (वय ४१, रा. बुधवारपेठ पुणे) यांनी ज्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे गेले अरुण राजेंद टिकरे (रा. भवानीपेठ पुणे), जोगेश्वरी विक्रांत भिंगे (रा. पाषाण) या दोघांसह संगणक प्रणालीमध्ये फेरफार करणाऱ्या अज्ञाताविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
















