- चिखलीतील घटना; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- तब्बल ८१ हजार रुपये खर्च करून शिवाजी गायकवाड (रा. पार्वती कॉम्प्लेक्स, चिंचेचा मळा, चिखली) यांनी नवीन दुचाकी (एमएच १४ जेक्यू ८०४७) सोमवारी (दि. ५) खरेदी केली.
गाडीसाठी ६० हजार रुपयांचे कर्ज काढले. पूजा करून दुचाकी लॉक करून ठेवली. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गाडी पाहण्यासाठी पार्किंगमध्ये आले असता दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले.
खरेदी केलेली नवीन गाडी अवघ्या १२ तासांत चोरीला गेली. सागर दिलीप काटे (वय ३६, रा. मुंजोबा चौक, पिंपळे सौदागर) यांनी बुधवारी (दि. ७) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
















