- १५ ठिकाणी नाकाबंदी तर २४ ठिकाणी कोंबिंग..
- कासव तस्करी, कालिका मंदिर कळस चोरी व दिघीतील त्या घटनेचा पर्दाफाश..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- कोंबिंग ऑपरेशनमध्ये ४५ आरोपींवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. ७) ऑपरेशन ऑल आऊट राबविले. १५ ठिकाणी नाकाबंदी तर २४ ठिकाणी कोंबिंग करत रेकॉर्डवरील, फरार, तडीपार २५५ आरोपींना चेक केले. कारवाई दरम्यान तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
त्यात चाकण येथील कासव तस्करीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पिंपळे निलखमधील नवयुग कालिकादेवी मंदिराचे कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सहा जुलै रोजी पहाटे तीन वाजता घडली. त्या घटनेतील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या, तसेच खंडणी,जबरी चोरी ने दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांसोबतच ५२० पोलिसांनी या कोंबिंग मध्ये सहभाग घेतला.
















