- भोसरी, वाकड, निगडीतून दुचाकी व रिक्षा चोरीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :- भोसरी व वाकडमधून प्रत्येकी एक दुचाकी व निगडीमधून एक रिक्षा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भोसरीमधील शिवगणेश नगरमधून १५ हजारांची दुचाकी चोरीला गेली. हा प्रकार २३ जूनला रात्री १० ते २४ जून सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत घडला. किसन तात्याराव बिरादार (वय ३८, रा. शिवगणेशनगर, धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घराजवळून रिक्षा चोरी केली. सेक्टर २४ निगडी-प्राधिकरण येथे बुधवारी दुपारी अडीच ते पावणेचार वाजताच्या कालावधीत ही घटना घडली. मुस्ताक हुसेन सय्यद (वय ४५, रा. सेक्टर २४, निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
डांगे चौक, दत्त मंदिर रोड येथील पार्किंगमधून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता चावीसह चोरी केली. विपुल डेविड गडकर (वय २७, रा. खडकी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.