- ‘दहा रुपयांत कुठेही दिवसभर फिरा’…
- विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचे महापौरांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :- पुणे शहरासाठी पीएमपीएमएलची ‘दहा रुपयांत कुठेही दिवसभर फिरा’ ही योजना आजपासून सुरू होत आहे. ही योजना पिंपरी चिंचवड शहरामध्येही राबविण्यात यावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापौर माई ढोरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे महापालिकेतील पदाधिकारी व प्रशासनास ही योजना राबविता येते. तर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनास पिंपरी चिंचवड शहरात ही योजना का राबविता येत नाही?
पुणे महापालिका ज्या पध्दतीने पुणे शहरासाठी १० रुपयांत दिवसभर प्रवास ही योजना राबवित आहे, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेनेही पुण्याच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरासाठी ‘१० रुपयांत दिवसभर फिरा’ ही योजना तातडीने पिंपरी चिंचवड शहरासाठी राबविण्यात यावी, असे मिसाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.