न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जाने.) :- वाहतूक नियमांविषयी जनजागृतीच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात १२ जानेवारी २०१९ रोजी झेनेक्स इनोव्हेशन, प्रिमियर गु्रपने रस्ता सुरक्षा उपक्रमा अंतर्गत हेल्मेट ड्राईव्ह चे आयोजन केले आहे. या उपक्रमास पुणे शहर पोलीस दलाचे सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी www.10xtrueriders.com. संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी. ही हेल्मेट ड्राइव पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगगवेगळ्या ६ मार्गाने सीजनस् मॉल मगरपट्टा, गोळीबार मैदान एम जी रोड, सनस ग्राऊंड स्वारगेट, डी. पी. रोड कोथरुड, बालेवाडी आणि अॅटो क्लस्टर चिंचवड येथून एकाच वेळेस सकाळी ७.३० वाजता सुरु होऊन, फेरीचा शेवट पुणे पोलिस ग्राऊंड शिंवाजीनगर येथे होईल, अशी माहिती झेनेक्स इनोव्हेशन, प्रिमियर गु्रपचे सीईओ अनुज गुप्ता यांनी दिली.
अनुज गुप्ता पुढे म्हणाले की, नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. सामाजाचे आपण काही तरी देण लागतो, म्हणून सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठीच दुचाकीवरून हेल्मेट ड्राईव्ह काढण्यात येणार आहे. दुचाकी चालकांकडून हेल्मेटचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्मेटचा वापर करण्यात आलेला नसल्याने अनेक अपघातांमध्ये दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हेल्मेट राईड काढण्यात येणार आहे. या माध्यमातून हेल्मेटचे महत्व, वाहन चालवताना आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे, नो ओव्हर स्पीडींग, नो ड्रिंक अॅण्ड ड्राईव्हींग, वाहन चालवताना मोबाईलवर न बोलणे, सिट बेल्टचा वापर करणे आदी बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
पुणे शहर हे सदैव महाराष्ट्र व देशासाठी एक मार्गदर्शकाचे काम करीत असते. हेच कायम ठेवत पुणे शहर वाहतुक नियमाबाबत कसे आदर्श आहे दाखवून देण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा आणि झेनेक्स इनोव्हेशन, प्रिमियर गु्रप ने आयोजित केलेल्या आणि शहर पोलीस दलाचे सहकार्य लाभलेल्या या हेल्मेट ड्राईव्ह फेरी सहभागी व्हा, असे आवाहन पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे.
तसेच वाहतुक पोलिस उपायुक्त (डीसीपी) तेजस्वीनी सातपुते यांनीही आवाहन करीत म्हणाल्या की, वाहन चालवताना स्वत:ची काळजी तर घ्या पण इतर वाहनचालकांची काळजी घ्या आणि वाहतुकीचे नियम पाळा. जेणेकरून अपघात कमी होतील. वाहुतक जनजागृती हा उद्देश ठेवून हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. सर्व नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी होऊन वाहतुक नियमाबाबत जनजागृती मध्ये हातभार लावा असे आवाहन ही यावेळी केले.











