न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची (२६ डिसें. १८ व १. जाने. १९) या दोन तहकूब सभा आज शुक्रवार (दि. ४) रोजी सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडल्या.
यात च-हाली येथील चोविसवाडी, वडमुखवाडी रस्ता विकसित करणेकामी येणा-या सुमारे १९ कोटी ४७ लाख रुपये, अग्नीशमन केंद्रामध्ये व वाहनांवर वायरलेस यंत्रणा उभारणेकामी येणा-या सुमारे ३५ लाख ३६ हजार रुपये, भोसरी येथील कै.सखूबाई गबाजी गवळी उदयान येथील लेझर शोसाठी प्रेक्षक गॅलरी व इतर कामे करण्यासाठी रक्कम रूपये ३७ लाख ६५ हजार रुपये व आदी विकासकामे मिळून एकूण ३५८ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या विषयांना आज झालेल्या स्थायीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे.
गेल्या दोन्ही तहकूब सभेंचा वचपा आज झालेल्या स्थायीच्या सभेत सदस्यांनी काढला आहे. आजच्या सभेत तब्बल ३५८ कोटी रुपयांच्या विषयांना मान्यता देण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांचा वर्षभराचा कार्यकाळ संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आतापासूनच शहरातील विकासकामे मंजूर करून घेण्याचा सपाटा स्थायीच्या सभेत सुरु होणार आहे.











