न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जाने.) :- सभापती सीमा चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली शहर सुधारणा समितीची विशेष सभा गुरुवार (दि. ३) रोजी पार पडली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडीतील जयभीमनगरमधील झोपडपट्टीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे.
त्याकरिता ३६ इमारतींमध्ये एकूण ७१४३ सदनिका बांधण्याच्या सुधारित खर्चाच्या उपसूचनेला शहर सुधारणा समितीच्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली आहे. पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ २९६ चौरस फूट असले, तरी देखील विक्रीसाठी ३०० ते ८०० चौरस फूट क्षेत्रफळ उपलब्ध असणार आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत ९१० कोटी असून, सुधारित किंमत १७५७ कोटी एवढी धरण्यात आली आहे. यामध्ये जमीन मालकाकडून ही जमीन खरेदी केली जाणार असून, त्यासाठी २०० कोटी रुपये दिले जाणार आहेत.
दापोडी येथील सिध्दार्थनगर, जयभीमनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरेवस्ती या झोपडपट्ट्यांचा यात समावेश असणार आहे.











