न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जाने.) :- मेट्रोचे पिलर उभे करीत असताना आज शनिवार (दि. ५) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथे अचानक क्रेन कोसळली व परिसरात हाहाकार उडाला.
सुदैवाने दुपारची वेळ होती व रस्त्यावर वर्दळ कमी असल्यामुळे जीवितहानी टळली. परंतु, पुण्याहून पिंपरीकडे येणा-या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यात जीवीतहाणी झाली नसली तरी, क्रेन कोसळण्यापूर्वी अवघ्या काही सेकंदातच एक खासगी बस प्रवाशांना घेऊन मार्गस्त होत होती. क्रेन जमीनीवर कोसळण्यापूर्वी काही सेकंदातच बस पुढे गेल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.











