न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जाने.) :- पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडीतील नाशिक फाटा येथे मेट्रोचे पिलर उभे करीत असताना दुर्घटना घडली आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे शिवसेनेने केली आहे.
या घटनेमुळे मेट्रोने नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मागेही पिंपरीत मेट्रोने उभारलेल्या पिलरला तडे गेल्याचे प्रकरण फार जुने नाही. वेळीच निदर्शनास आल्यामुळे या निकृष्ट दर्जाचा पिलर नंतर हटविण्यातही आला. मात्र, या निम्मिताने मेट्रोच्या गुणवत्तेचा प्रश्न पून्हा ऐरणीवर आला आहे.
प्रशासनाने निगडी ते दापोडी या परिसरात मेट्रो उभारणीचे काम एका ठेकेदारास (शिर्के कंपनी) दिले आहे. या ठेकेदारच्या कामाची गुणवत्ता मागे घडलेल्या प्रकरणावरून दिसून येते. त्यामुळे मेट्रोची गुणवत्ता कशी सुधारणार? तसेच पुन्हा या घटना घडू नयेत यासाठी काय उपाययोजना करणार? याचा लेख जोखा मेट्रोने नागरिकांना देण्याची मागणी होत आहे.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रोच्या व ठेकेदाराच्या कामांची चौकशी करावी, अन्यथा भविष्यात अशा दुर्घटना पून्हा घडल्यास शिवसेना कदापि माफ करणार नाही व त्या ठेकेदाराला सोडणारही नाही, असा इशारा शिवसेनेचे युवराज दाखले यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.















