- व्हिडीओद्वारे दबंगगीरी करणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून गचांडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- तरुणाने सोशल मीडियावर हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यामध्ये त्याने कोयता दाखवून दहशत निर्माण केली होती.
तर तिसऱ्या पोस्टमध्ये त्याने ‘आमची सूत्र येरवडा जेलमधून हालतात’, असा व्हिडीओ बनवून बुधवारी (दि. १४) सोशल मीडियावर व्हायरल केले. गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती काढत तरुणाला ताब्यात घेतले.
मयूर अनिल सरोदे ऊर्फ यमभाई (वय २१, रा. दुर्गानगर, निगडी-भोसरी रोड, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर पूर्वी गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल आहे.












