- भर रस्त्यात फिरणाऱ्या वृद्धाला अटक; चिंचवडमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- शस्त्रे बाळगण्यास मनाई असताना आरोपी हा तलवार सदृश हत्यार जवळ बाळगून सार्वजनिक रस्त्याने फिरत होता. पोलीस हवालदार शांताराम हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ७५ वर्षीय वृद्ध आरोपीला अटक केली. मंगळवारी (दि. १३) दुपारी इंदिरानगर, चिंचवड येथे ही घटना घडली. सुभाष मुरलीधर करडे (वय ७५, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या वृद्धाचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












