- या ७५ केंद्रांवर लसीकरण; गरोदर मातांसाठीही डोस राखीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. १६) रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा फक्त पहिला डोस हा १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, यमुनानगर रुग्णालय, तळवडे समाज मंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका शाळा बोपखेल, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, आदिशक्ती हॉस्पिटल भोसरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, निळु फुले नाट्यगृह सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, महापालिका शाळा वाकड, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, नताशा आय क्लिनिक पिंपळेसौदागर, काकाज इंटरनॅशनल स्कूल तापकिर मळा, काळेवाडी, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या ३५ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १००,२००,३००,४०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. वय ४५ वर्षावरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेडगेवार जलतरण तलाव, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा चिखली,स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, भानसे स्कुल यमुनानगर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, गंगोत्री पार्क दिघी, कासारवाडी दवाखाना, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा,कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, जुने तालेरा रुग्णालय, महापालिका शाळा किवळे, आठवडा बाजार जवळ रावेत, बिलजीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या २८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २००,३००,४०० या लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींनाफक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन जिजामाता, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थींच्या क्षमतेने देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्याजवळ या सीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थींच्या क्षमतेने देण्यात येईल.
गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करण्यासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै. ह. भ. प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.