- या ४ केंद्रांवरच लसीकरण; गरोदर मातांसाठी डोस नाहीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) :-पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि. २०) रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
नवीन जिजामाता रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन या दोन लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
तसेच ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या ४५ वर्षे वयोगटासाठी केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्याजवळ या २ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण उद्या बंद राहील. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.