- संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२१) : भोसरी, वाकड, हिंजवडी, तळेगाव-दाभाडेमधून रविवारी (दि १८) रोजी वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. संबंधितानी अज्ञात चोरट्या विरोधात शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
पेट्रोल संपल्यामुळे राक्षेवस्ती येथील एका हॉटेलसमोर पार्क केलेली २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच १२ / एन टी ३५५७) सहा जुलै रोजी रात्री अकरा वाजता दुचाकी चोरून नेली. सात जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. सद्दाम लियाकत अली अन्सारी हुसेन (वय २७, रा. राक्षे वस्ती रोड, माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. लांडेवाडी येथील अॅम्फेनाॅल कंपनीसमोर पार्क केलेली वीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच २८ / ए एच ३७५३) २४ मे रोजी सकाळी आठ वाजता चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी साडे आठ वाजता उघडकीस आला. वरूण निलेश सुडोकार (वय २०, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
वाकडमधील वाघमारे चौकात सिल्वर जिम येथे पार्किंग मध्ये पार्क केलेली १५ हजार रुपये किमतीचे दुचाकी (एम एच १२ / जे बी ५४९४) १७ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी सहा वाजता उघडकीस आला. खेमिया हनुमंता मेघावत (वय ३२, रा. संजयगांधी वसाहत, पाषाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.सोसायटीच्या बाहेरील पार्किंगमध्ये पार्क केलेली दोन लाख रुपये किंमतीची इको व्हॅन (एम एच १२ / पी एच ०८३५) १७ जुलै रोजी रात्री नऊ वाजता चोरून नेली. हा प्रकार १८ जुलै रोजी दुपारी उघडकीस आला. रमेश घिसाराम चौधरी (वय ३४, रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.