- स्थानिकांच्या मागणीला यश; पालिकेकडून जागा उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२१) :- नागरिकांना विविध दाखले, जमिनीचे उतारे काढण्यासाठी चिखली येथील तलाठी कार्यालयात जावे लागत होते. यामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याने तळवडे गावातच तलाठी कार्यालय असावे, अशी नागरिकांची मागणी होती.
तळवडे येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली. या ठिकाणी तळवडे गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय होणार आहे. तळवडे, रुपीनगर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना विविध शिष्यवृत्तीसाठी लागणारे दाखले, रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले जमिनीचे विविध उतारे काढण्यासाठी चिखली येथील तलाठी कार्यालयात जावे लागत होते.
यासाठी वेळेचा मोठा अपव्यय होत असे. प्रसंगी कामाला दांडी मारावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत होता. हा त्रास वाचण्यासाठी गावातच तलाठी कार्यालयाची मागणी नागरिक करत होते.