- वाकड पोलिसांकडून बापाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२१) :- सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत मारहाण केल्याचा प्रकार घडला. वाकड येथील राहत्या घरात २०१६ ते आजपर्यंत हा प्रकार सुरू होता.
याप्रकरणी मुलीने आपल्या सावत्र बापाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी बापाला अटक केली आहे. फिर्यादी मुलगी ही आपल्या सावत्र वडिलांसोबत त्यांच्या घरात राहते. गेल्या काही वर्षात आरोपी सातत्याने फिर्यादी मुलीवर लैंगिक अत्याचार करत आहेत.