- भोसरीतील घटना; तिघांना बेड्या..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२१) :- आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या दोन मित्रांना रस्त्यात अडवून त्यांना लोखंडी सूऱ्याचा धाक दाखवून मोटरसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३५ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.
ही घटना रविवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. मनोज गजानन बुध (वय २८, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संजय दादाभाऊ माने (वय ४०), अजय विनायक म्हस्के (वय २७), किरण सुरेश बोबले (वय २४, तिघे रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.