- ३० मशीन जप्त; ११ जणांवर गुन्हे दाखल; भोसरी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २०. जुलै. २०२१) :- इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेमद्वारे मशीनवर आकडे खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर भोसरी पोलिसांनी छापा टाकून ३० मशीन जप्त केल्या असून ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
भोसरीतील केएसबी चौकाजवळील शाहूनगर येथील वैभव कॉम्प्लेक्समधील सत्यम मार्केट व मोशीतील ओमगुरुदत्त व्हिडिओ गेम येथे ही कारवाई केली. रुपयाला ३० रुपये भाव तर, मोशीतील ओमगुरुदत्त व्हिडिओ गेम येथे रुपयाला १५ रुपये भावाने जुगार खेळला जात होता.
पोलिसांनी याप्रकरणी व्हिडिओ गेम पार्लर चालक अभिजित राजेंद्र सोळंके (वय ३२, रा. काळेवाडी फाटा, वाकड), कामगार सुरेश महादु ठाकूर (वय ५१, रा. कुदळवाडी), जुगार खेळणारा अमोल दिलीप वायकर (वय २९, रा. चिखली) तसेच व्हिडिओ गेम पार्लर मॅनेजर अजित संभाजी जाधव (वय २१, रा. मोहननगर, चिंचवड), कामगार आदेश बाळाजी जाधव (वय २० रा. दत्तनगर, निगडी), जुगार खेळणारे नितीन ज्ञानोबा मोरे (वय ४०, रा. चिखली), सागर विजय महापुरे (वय ३५, रा. दत्तनगर, चिंचवड) आणि किरण विठ्ठल साळुंखे (वय २६, रा. मोहननगर, चिंचवड) तसेच बाळगोंडा पायगोंडा पाटील (वय ४०, रा. मरकळ), दिनेश सूर्यभान भोळे (वय २७, रा. कुरुळी, ता़ खेड), श्रीनिवास चंद्रकांत त्रिबंके (वय २८, रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत़.