न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जाने.) :- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बेताल वक्तव्य करण्याची सवयच लागलेली आहे. कोणताही मागमूस न बघता आपल्या बेताल वक्तव्याने समाजात अनागोंदी माजविण्याचा प्रकार मंत्री तावडे करीत आहेत.
या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली रविवार (दि. ७) रोजी पिंपरीतील आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पूतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनास शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, गणेश पाडुळे, मारूती मस्के, प्रदिप दळवी, संजय शिंदे, आंकुश कोळेकर, दत्ता गिरी, रविकिरण घटकार, भिमराव कुलकर्णी, निलेश भोरे, आपना वतन संघटनेचे जितेंद्र जुनेजा, शिवशाही व्यापारी संघाचे तेजस दाखले, शिवबंधन सोशल फाऊंडेशनचे सौरभ शेंडगे, धनराज दाखले, अनिकेत थोरात, तेजस थोरात, तुषार थोरात, शाम मांढरे, गणेश इंगळे. डॉ इम्राम बेग, रिजवान बेग, दिपक कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.











