- पिंपळे गुरवमध्ये वृक्षारोपण, शासकीय दाखले व कोरोना योद्ध्यांचा होणार गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२१) :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
दरम्यान नागरिकांना रोपांचे वाटप करण्यात येणार असून ई सेवा उपक्रमांतर्गत आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड तसेच ज्येष्ठ नागरिकांना कार्ड मोफत काढून देण्यात आहेत. तसेच विविध शासकीय उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमासाईल सर्टिफिकेट आदी कागदपत्रेही मोफत काढून देण्यात येणार आहेत, गरजू व्यक्तींनी या महिमेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन शामभाऊ जगताप युवा मंचचे अध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, शामभाऊ जगताप युवा मंचचे अध्यक्ष शामभाऊ जगताप, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, युवा नेते तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, तृप्ती जवळकर, शहर उपाध्यक्षा उज्ज्वला ढोरे, सुषमा तनपुरे आदी उपस्थित राहणार आहेत.
अजितदादा पवार यांनी कोरोनाच्या अनुषंगानं वाढदिवस साजरा न करता विविध समाजपोयोगी व विधायक कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रभागात वृक्षारोपण, कोरोना योद्धयांचा गौरव व विविध शासकीय दाखले काढून देण्यात येणार आहेत.
– मा. शामभाऊ जगताप, अध्यक्ष – शामभाऊ जगताप युवा मंच, माजी शहराध्यक्ष – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, चिंचवड विधानसभा…