- गुरुवारी फक्त या ४ केंद्रांवरच मिळणार ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा डोस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. २२) रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
नवीन जिजामाता रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन या दोन लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत ९० + १० (गरोदर व स्तनदा मातांसाठी राखीव) लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
तसेच ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या ४५ वर्षे वयोगटासाठी केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखान्याजवळ या २ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
गरोदर महिला व स्तनदा मातांसाठी लसीकरण केंद्राच्या क्षमतेमधील १० डोस राखीव ठेवण्यात येतील व त्यांचे लसीकरण ऑन द स्पॉटर जिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.