- बनावट नाव व कागदपत्रांच्या आधारे करीत होता वास्तव्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२१) :- न्यायालयाने फरारी घोषित केलेल्या आरोपीला चक्क तेरा वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीवर २००८ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे.
हनुमंत उर्फ पिंट्या महादेव चव्हाण (वय ३८, रा. विद्यानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चव्हाण हा अटक टाळण्यासाठी अमित महादेव पाटील या बनावट नावाने सातारा, औरंगाबाद, पुणे शहरात बनावट दोन आधारकार्ड, सातारा आरटीओचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँक ऑफ बडोदाचे डेबिट कार्ड या कागदपत्रांच्या सहाय्याने वास्तव्य करीत होता. २५ ऑगस्ट २००८ ते १६ जुलै २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हजरतअली पठाण यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने त्याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.