- शुक्रवारीही कमी दाबाने होण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२१) :- एमआयडीसीच्या रावेत येथील जलशुध्दीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहुरोड, कासारवाडी फुगेवाडी, निगडी, सी.एम. ई. आर डी दिघी, व्ही.एस.एन.एल., कॅटोंन्मेन्ट बोर्ड, ओ.एफ. डी. आर. या भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.
गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी पाणीसाठा बंद तर, शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले आहे.