- नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांकडून २३ लाख ७१ हजाराचा दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- पुणे-मुंबई महामार्गावर आरटीओच्या विशेष पथकाने नियमांचे उल्लघंन करणाऱ्या व सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण २३ लाख ७१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत चलन ७६०, ओवर स्पीड ११४, लेन कटिंग ५३३, ओव्हर लोड ४४, हेल्मेट ७, सीट बेल्ट ८, टॅक्स ६, नो एंट्री ३, बस १६, रिफलेक्टर ८०, इंडिकेटर २७, फिटनेस १३, मोबाईल टॉकिंग ४, बैलगाडी कारवाई १, मोटार ड्रायव्हिंग वाहन चालक परवाना ६९, पीयुसी १४, हॉर्न २३, बेकायदा प्रवासी ३, फॅन्सी नंबर प्लेट १६, अधिक माल २६, साइट बार, रिअर साइट बार ९, फायर एक्विपेंट ५, चुकीची एक्विट ५, रासायनिक पदार्थांची वाहतूक १ अशी कारवाई करण्यात आली.