- टोईंग व्हॅन वाहने पुरविणा-या संस्थेची नेमणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- महापालिकांनी बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची कारवाई करण्यासाठी पोलिसांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, निश्चित केलेल्या धोरणानुसार कारवाई करावी. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर त्याची नोंदवही तयार करावी. निनावी तक्रारीदेखील घ्यावे, असे राज्य सरकारने आदेशात म्हटले आहे. त्यानुसार शहरातील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात सुमारे तीन हजार बेवारस वाहने असून ही वाहने उचण्यासाठी १० ते १५ लाखांचा खर्च होणार आहे.
पोलिसांच्या पाहणीमध्ये तब्बल अडीच ते तीन हजार बेवारस वाहने शहरात विविध ठिकाणी आढळून आली. त्यानुसार महापालिकेने ही बेवारस वाहने उचलण्याकरिता टोईंग व्हॅन वाहने पुरविणा-या संस्थांकडून दर मागविले होते. त्यामध्ये समीर एंटरप्रायजेस, महाराष्ट्र क्रेन सरिहंस आणि सिटी क्रेन सव्हिस यांनी दरपत्रक महापालिकेला सादर केले. त्यापैकी सर्वात कमी दराचे समीर एंटरप्रायझेस यांचे दर स्वीकारण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
त्यानुसार, समीर एंटरप्रायजेस यांना बेवारस वाहने उचलण्याकरिता स्वयंचलित टोइंग वाहने पुरविण्याचे काम दिले आहे. अंतरानुसार दिली जाणार रक्कम मोशी कचरा डेपोनजिक बेवारस वाहने टाकली जाणार आहेत तेथून किती किलोमीटर अंतरावरुन वाहन उचलून आणले आहे. त्यानुसार संस्थेला मोबदला देण्यात येणार आहेत. पाच किलोमीटरवरुन चारचाकी उचलून आणल्यास ८५०, दहा किलोमीटर अतरासाठी १२००, १५ किलोमीटर अंतरासाठी २५०० आणि २० किलोमीटर अंतरासाठी ५००० रुपये देण्यात येणार आहेत. तर, दुचाकी आणल्यास पाच किलोमीटरसाती ४०० रुपये, दहा किलोमीटरसाठी ६५० रुपये देण्यात येणार आहेत.












