- पिंपरी चिंचवडची तहान भागविणारे पवना धरण ५५ टक्क्यांवर..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पिंपरी चिंचवडची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासात धरण परिसरात २३२ मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात ९.९९ टक्यांनी वाढ झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ५५.७ टक्के झाला आहे. अजून काही दिवस पाऊस असाच बरसत राहिला लवकरच पवना धरण शंभर टक्के भरेल.