- क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्याच्या आमिषाने दीड लाखाची फसवणूक….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- फोनवरील अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना २० फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजता ७५१८९६१९१० या क्रमांकावरून फोन केला. एसबीआय कस्टमर केअर मधून बोलत असून नवीन क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देतो असे सांगितले.
फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला. त्यानंतर फिर्यादी यांना तो ओटीपी कोड विचारून फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्ड मधून एक लाख ६७ हजार रुपयांचा व्यवहार करत त्यांची फसवणूक केली.
रणजीत अरुण पाटील (वय ३३, रा. बोराटेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ७५१८९६१९१० या क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.