- पवना नदीपात्र दुथडी भरून वाहू लागलं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२१) :- गेली दोन दिवस पावसाने शहरात धुमाकूळ घातला आहे. संततधार सुरू असल्यामुळे परिसरात पावसाच्या बाबतीत समाधानकारक स्थिती आहे. तर, या पावसाने पवना नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. चिंचवडच्या श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे.
गतवर्षी याच दिवसांमध्ये पर्जन्यवृष्टी अधिक प्रामाणात झाली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे नागरिकांत पावसाविषयी चिंता वाढली होती. परंतु, या आठवड्यातील पहिल्या दिवसांपासून पावसाची जोरदार सुरूवात झाली आहे.
दोन दिवसांच्या वाढत्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या संपूर्ण भागात पाणीच पाणी झाले आहे. झोडपट्ट्या, नदीपात्रालगत पाणी वाढल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील नागरिकांचे सुरक्षीतस्थळी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.












