- वाढत्या महागाई विरोधात शहर मनसेची भर पावसात सायकल रॅली…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२१) :- वाढत्या महागाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी (दि. २२) रोजी पिंपरी चिंचवड शहरात भर पावसात सायकल रॅली काढून, केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
या आंदोलनात नगरसेवक तथा शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पटेकर, विशाल मानकरी, राजू सावळे, बाळा दानवले, सुशांत साळवी, दत्ता घुले, आश्विनी बांगर, सीमाताई बेलापूरकर, हेमंत डांगे, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे, अविनाश तरडे, विशाल साळुंखे, सुरेश सकट, निलेश नेटके, रवी जाधव, नितीन चव्हाण, नारायण पठारे, भाऊराव नाईक, दत्ता धर्मे, स्वप्नील महांगरे, ज्ञानेश्वर पुदाले, संगीता ताई देशमुख, श्रद्धा देशमुख, स्नेहल बांगर, विद्या कुलकर्णी, सुजाता काटे, प्रवीण माळी, सोमनाथ मदने, प्रमोद जाधव, विकास खेडकर, सुमित कलापुरे, प्रफुल काळे, अविनाश तरडे, मनोज गुंड, संदीप हालगे, किसन हांडे, ज्ञानेश्वर पोळ, के. के. कांबळे उपस्थित होते.
सचिन चिखले म्हणाले, सन २०२० पासून भारतातील जनता कोरोनासारख्या महामारीपासून त्रस्त झाली आहे. केंद्राने आपलं बजेट जाहीर केलं. त्या बजेटमध्येदेखील सर्व अत्यावश्यक गोष्टीचे दर वाढवून ठेवले. सलग सहा महिन्यात खाद्यतेलाचे, पेट्रोल-डिझेलचे, गॅस सिलेंडरचे दर भरमसाठ वाढून ठेवले आहे. केंद्र सरकारने सरळ सरळ नागरिकांची फसवणूक केली आहे. त्याविरोधात भरपावसात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पेट्रोलचा झालाय १०७ रुपये रेट, शेठ तुम्ही नादच केलाय थेट, सर्वच अत्यावश्यक गोष्टींचा वाढलाय रेट,शेठ तुम्ही नादच केलाय थेट! मोदी सरकारचा निषेध असो, मोदी के अच्छे दिन कहा गये, महंगाई करके सो गये! अशा घोषणा देण्यात आल्या.












