- आयुक्तांकडून तब्बल १०९ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२१) : पिंपरी चिंचवड महापालिकेने गट अ, ब, क आणि ड या श्रेणीतील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांसंदर्भात १३ फेब्रुवारी २०१७ रोजी परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार कार्यकारी अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता आरोग्य, सर्व्हर, स्थापत्य, विद्युत व भांडार विभाग अशा तब्बल १०९ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या दुसऱ्या टप्पात करण्यात आल्या आहेत.
यात मुख्य आरोग्य निरीक्षक २, आरोग्य निरीक्षक ४, वीजतंत्री ४, विद्युत विभागाचे ४ कनिष्ठ अभियंता, सर्व्हअर ८, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ६, वीज पर्यवेक्षक ६, स्थापत्य विभागाचे ३० कनिष्ठ अभियंता, भांडारपाल ७, सहभांडारपाल २, मीटर निरीक्षक १५, कॉम्प्युटर ऑपरेटर १९ यांचा समावेश आहे.
बदली झालेल्या कर्मचा-यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, रुजू न झाल्यास, बदली आदेशाचा अवमान केल्यास तसेच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्यात येईल. शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.












