- दोघांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२१) :- इंडियन ऑईल पेट्रोल पंप कासारवाडी येथे आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीची २०० मीटर इंटरनेट फायबर आणि जॉईंट क्लोजर असा एकूण बत्तीस हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच फुगेवाडी मेट्रो स्टेशन जवळ एअरटेल कंपनीचे इंटरनेट सायबर कट करून चोरी करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना सहा जुलै रोजी इंडियन ऑईल पेट्रोल पंप कासारवाडी येथे आणि १३ जुलै रोजी फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे घडली. राहुल दिलीप सणस (वय ३६, रा. कोथरूड) यांनी गुरुवारी (दि. २२) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रतिक सोपान लोंढे (वय २८, रा. कासारवाडी), अविनाश धर्मराज कटके (वय २८, रा. आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.