- टोळीवर गंभीर स्वरूपाचे तब्बल १२ गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- दुखापत, जबरी चोरी, विनयभंग करणे, बेकायदा जमाव जमवून दरोडा, जबर दुखापत, खंडणी उकळण्यासाठी गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगणे, असे एकूण बारा गुन्हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील एमआयडीसी भोसरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ डिप्शा गायकवाड व त्यांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई भोसरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
संघटित गुन्हेगारी हिंसाचाराचा वापर करून वर्चसवासाठी व फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. कारवाई करण्याबाबत अपर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांचेकडे पाठविला होता. पोलीस उपआयुक्त ( गुन्हे) सुधीर हिरेमेठ , सहायक पोलीस आयुक्त पीसीबी ( गुन्हे १) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र गौर यांनी प्रस्ताव आदेश पारीत करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्याकडे पाठविला. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आदेश पारीत केला.
सुरज ऊर्फ डिप्शा महादेव गायकवाड ( वय २१ रा. लकी स्कॅप सेंटर मागे, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी ) जावेद लालसाहब नदाफ ( वय २२ ) रा. नाल्याजवळ महात्मा फुलेनगर झोपडपट्टी भोसरी, अजय बाळु ससाणे, ( वय २२ ) मस्जिद जवळ, महात्मा फुलेनगर झोपडपट्टी भोसरी, ओंकार ऊर्फ अण्णा बाळु हजारे ( वय २५ रा. वेताळनगर, चिंचवड) यांच्यावर कारवाई केली आहे.