- स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष; समस्या सोडविण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- काळेवाडी परिसरामध्ये सर्वच रस्त्यांवरती पावसाचे पाणी साचत असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना वाहणे चालविताना रस्त्यावरील खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागत आहे.
तसेच काळेवाडी मेन रोड डी मार्ट समोरील गजानन कॉलनी, विठ्ठल रुक्मिणी कॉलनी, जोतिबा कॉलनी येथील ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे मैला मिश्रित पाणी सर्व रस्त्यावरती वाहत आहे. पाच दिवसांपासून पाण्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक, दुकानदार त्रस्त झाले आहेत.
घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असल्याने साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक नगरसेवकांनी त्वरित ही समस्या मार्गी लावावी, मागणी ज्योतीबा कामगार कल्याण मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन खेडेकर यांनी केली आहे.











