- पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची जोरदार मार्चेबांधणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- फलकांचे उद्घाटन कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अशा कार्यक्रमांचे आयोजन करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पिंपरी, भोसरी आणि चिंचवड तीनही मतदार संघात शुक्रवारी राष्ट्रवादीमय वातावरण केले होते.
आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. तसेच येणाऱ्या पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळावी यासाठी पक्षश्रेष्टीकडे आग्रही मागणी करणार असल्याचे शेख यांनी सांगितले. त्यामळे शहरातील युवकांच्या आशा अधिकच पल्लवित झाल्या असून ते आणखी जोमाने कामाला लागले आहेत. शुक्रवारी पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदार संघात ठिकठिकाणी फलकांचे उद्घाटन झाले. यावेळी चिंचवड विधानसभेवर २० नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करत ५ बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पत्रकार परिषेदेचे आयोजन करत मेहबूब शेख यांनी भाजपला टार्गेट केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधीपक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक कैलास थोपटे, माजी नगरसेवक माऊली सूर्यवंशी, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, संदिप चिंचवडे, विजय आवटे, युवा नेते विराज लांडे पाटील, युवक कार्याध्यक्ष शाम जगताप, योगेश गवळी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे, भोसरी विधानसभा अध्यक्ष अमित लांडगे, माधव पाटील, युवक प्रवक्ते भागवत जवळकर, युवक उपाध्यक्ष प्रसाद कोलते, प्रशांत सपकाळ, शहर उपाध्यक्ष विशाल पवार, शहर सरचिटणीस प्रतीक साळुंखे, चेतन फेंगसे, ऋषिकेश सूर्यवंशी, अमोल पाटिल, मनोज वीर. गौरव नलगे, वेदांत माळी, सागर सुतार आदी उपस्थित होते.
युवकांची फौज सज्ज…
पिंपरी चिंचवड शहरासह चिंचवड मतदार संघात आम्ही प्रभागनिहाय पक्षबांधणीसाठी काम सुरु केले आहे. चिंचवड विधानसभेत अनेक युवकांच्या नियुक्त्या केल्या असून फलकांचे उद्घाटन केले आहेत. राष्ट्रवादीचे विचार प्रत्येक घराघरात पोहचविण्यासाठी आमची युवकांची फौज सज्ज झाली आहे.
– कुणाल थोपटे – अध्यक्ष, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवक…












