न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जाने.) :- भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे व त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची नुकतीच भेट घेतली.
यावेळी केंदळे यांनी जिल्हाधिकारी व उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार प्राधिकरणाने वाढविलेली २०० मीटर कथित रेड झोन हद्दीतील बाधित क्षेत्र कमी करावे तसेच याकामी आवश्यक तो ठराव पारीत करावा. गुगल/स्केच-पी नकाशाची अंमलबजवाणी करून यमुनानगर व परिसरातील रेडझोन बाधित दीड ते दोन हजार घरांना रेडझोन मुक्तीचा दिलासा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात केंदळे यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने सन १९४०-५० मध्ये स्थापन केलेल्या अँम्युनेशन डेपोसाठी ६० वर्षानंतर जागे होऊन, (दि. २६/१२/२००२) च्या अधिसुचनेनुसार ‘अँम्युनेशन डेपो, देहूरोड, पुणे यांच्या बाह्य परिघ हद्दीपासून २००० यार्डामधील जागा बांधकाम व्यतिरिक्त ठेवण्याचे घोषित करण्यात आले. केंद्र शासनाच्या अधिसुचनेच्या अनुषंगाने (याचिका क्र . ८९८५/२००९) मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने २००० यार्डनुसार रेड झोनच्या हद्दी निश्चित केलेला नकाशा (गुगल/पी-स्केच) तात्काळ घोषित करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी पुणे यांना देऊन सदर याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली असल्याचे केंदळे म्हणाले.
जिल्हाधिकारी पुणे यांनी सादर आदेशानुसार देहूरोड, अँम्युनेशन डेपो, सहाय्यक संचालक नगररचना पुणे, भूमी अभिलेख पुणे, पिंपरी चिंचवड प्राधिकरण, एमआयडीसी व पिंपरी चिंचवड महापालिका आदी सर्व संबंधित विभाग व त्यांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून, आवश्यक ती पडताळणी करून, रेड झोनची सिंमकने निश्चित करून, अंतिमतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या मान्यतेने व स्वाक्षरीने २००० यार्ड रेडझोनच्या हद्दी निश्चित केलेल्या नकाशाची अंमलबजावणी करणेकामी (दि १६/०२/२०१३) रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ‘गुगल /पी-स्केच नकाशा प्रसिद्धी केला व सर्व संबंधितांना सदरच्या नकाशाची अंमबलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी यांनी घोषित गुगल /पी स्केच नकाशानुसार रेडझोन हद्दीमध्ये समाविष्ट क्षेत्रातील मिळकतीची नोंदी करून, त्याची अंमबलबजावणी केल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे पिं. चिं. प्राधिकरण, एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महापालिका यांना आदेश दिले होते. उपरोक्त आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २००० यार्डच्या प्रतिबंधक क्षेत्राचा (गुगल/पी-स्केच) नकाशातील रेषेच्या जाडीबाबत कायदा विभागाचे अभिप्राय घेऊन पालिकेच्या कार्यक्षेत्रातील २००० यार्डच्य प्रतिबंधक क्षेत्राचा गुगल व पी- स्केच नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ पालिकेच्या नोटीस बोर्डवर व वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येऊन, त्याची अंमबजावणी सुरु केली व करीत आहेत. महापालिकेचा नकाशा जुळला जातो, महापालिका रेड झोन हद्दीनुसार त्याची अंमबजावणी करते. उल्लेखित घोषित ‘गुगल-स्केच पी नकाशाची अंमलबजावणी करणे हे प्राधिकरणावरही बंधनकारक असूनही प्राधिकरणाकडून त्याची अमलबजवाणी करण्याऐवजी या आदेशाची पायमल्ली होत आहे. परंतु, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा (दि. १६/०२/२०१३) रोजीचा घोषित गुगल /स्केच-पी नकाशा हा प्राधिकरण्याच्या नकाशाशी जुळत नसल्याचे दर्शवून, (तज्ञ असलेल्या विभागानेच नकाशा जुळवणे व त्यानुसार रेखकांन बनविणे, या बाबतचे कोणतेही कार्य न करता, तसेच कोणतीही मोजणी प्रत्यक्षात न होता, कोणतेही प्रमाण व आधार न देता, कोणतीही शहानिशा ‘न ‘ होता) प्राधिकरणाच्या नगररचना विभागाने, प्राधिकरण सभेने घाईघाईने ३ वेळा अनुक्रमे (१) सभा क्र २९८ – २००० यार्ड ऐवजी दुप्पट यार्ड म्हणजे पेठ क्रं. २०, २१, २२, २३०, २४, २५ हे पूर्णतः आणि पेठ क्रं. १८, १९, २६, २७ चे बाधित ठरवले. २) सभा क्र.३०५ -चूक लक्षात आल्यावर पेठ क्र. १८, २५, २६ , २७ चे भागश: क्षेत्र वगळले. ३) सभा क्र. ३११ अंतिमतः बाधित क्षेत्रापेक्षा सरसकट २०० मीटर वाढवून पेठ २०, २१, २२, २३, २४ चे ‘गुगल-पी स्केच’ नकाशानुसार बाधित असल्यात दर्शविले म्हणजे प्राधिकरणच्या नगररचनाच्या विभागाने चुकीच्या, बेकायदेशीर प्रस्तावाने, रेडझोन नसताना, रेडझोनने बाधित होत नसताना, रेड झोनने बाधित क्षेत्रातील विकासकामांना स्थगिती दिल्यामुळे प्राधिकरण सभेत उपरोक्त ठरावामुळे (१) २०० मीटरने वाढीव, कथित बाधित क्षेत्रातील दीड – दोन हजार भूंखड धारकांचे’ हस्तांतरण, बांधकाम परवानगी, ना-हरकत दाखले, कर्ज प्रकरणे इ. कांमांना स्थगिती देऊन, नागरिकांची कामे बे-कायदेशीर रित्या थांबविली. त्यामुळे बाधित नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत तसेच २) उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत असून त्यास प्राधिकरणाचा वेळकाढूपणा कारणीभूत आहे, असेही केंदळे म्हणाले.
रेड झोनची २०० मीटरपर्यंत वाढीव हद्द कमी करण्याकामी संदर्भीय निवेदने व त्याच अनुषंगाने प्राधिकरणाव्दारे योग्य ती पडताळणी होऊन, प्राधिकरणाच्या (दि .१६/०१/२०१६) च्या टिप्पणीनुसार ”नगररचना विभागाव्दारे, मा जिल्हाधिकारी यांचे घोषित गुगल / स्केच – पी नकाशा हा प्राधिकरणाच्या नकाशावर दर्शविता येणे शक्य असून, पिं. चिं. महापालिकेने अवलंबिलेल्या धोरणानुसार नकाशावर रेषेची जाडी २० मीटर (कथित २०० मीटर ऐवजी) गृहीत घरून, रेडझोन बाधित क्षेत्र विचारात घेण्यात सुचविले. तसेच याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चर्चा होऊन, त्याच्या सूचनेनुसार सादर प्रस्ताव फेर सादर करण्याचा आदेश उपसंचालक नगररचना यांनी दिला. परंतु, आजतागायत संबंधित प्रस्ताव सादर केला नाही.
प्राधिकरणाने रेडझोन बाधित दिड ते दोन हजार भूखंड धारकांचा सहानुभूतीने विचार करून, तसेच मा. उच्च न्यायालय व मा. जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार सिंमकाने निश्चित केलेल्या ‘गुगल /स्केच-पी नकाशा’ ची त्वरित अंमलबजावणी करावी व २०० मीटर ने वाढविलेली कथित रेड झोन हद्दीततील बाधित क्षेत्रातील सर्व कांमांची स्थगिती उठविण्यासाठी विशेष सभा घेऊन आवश्यक तो ठराव पारित करून, रेडझोन बाधित दीड ते दोन हजार भूंखडधारकांना न्याय मिळवून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.











