न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जाने.) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी उद्या पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. यावेळी शहरातील नूतन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्घाटन तसेच विविध विकास कामांचे ई-भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चालू असलेल्या च-होली, रावेत, आकुर्डी, पिंपरी, बो-हाडेवाडी येथील प्रकल्पाचे तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत सिटी नेटवर्क, सिटी वायफाय, स्मार्ट किऑस्क व व्हेरिएबल मॅसेज डिसप्ले सोल्युशनबाबत पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.















