न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जाने.) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज मंगळवार (दि. ८.) रोजी सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी झालेल्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
वाकड येथील पुणे-बेंगलोर महामार्गावरील पूलापासून हिंजवडी मनपा हद्दीपर्यंत रस्ता रूंदीकरणासाठी २० कोटी ५५ लाख २९ हजार रुपयांच्या खर्चास तसेच प्रभाग क्र. ०५ गवळीनगर व सँडवीक परिसरामध्ये डांबरीकरणासाठी ६८ लाख ६० हजार, प्रभाग क्र.०३ च-होली येथील मुख्यरस्ता ते काळजेवाडी पर्यंतचा १८ मी. डी.पी. रस्ता विकसित करण्यासाठी १६ कोटी ३४ लाख ५३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
तसेच ग क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व मुता-यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई ५६ लाख रुपये, वाहन भाडे तत्वावर घेणेकामी १ कोटी १२ लाख ७८ हजार रुपये, प्रभाग क्र.०८ येथील तिरूपती ते स्पाईन रोड ते आर.टी.ओ कॉर्नर पर्यंत रस्ता दुभाजक करणे व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी ६८ लाख ४२ हजार रुपये व इतर अशा एकूण ५७ कोटी ६४ लाख ४५ हजार रुपयांच्या खर्चाच्या विकासकामांना स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.















