न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- कामगार नेते ”शहीद कॉ. दादा रुपमय चॅटर्जी” यांच्या ३५ व्या स्मृती सप्ताहानिमित्त पिंपरी येथील महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटनेच्या वतीने जीकेएन सिंटर मेटल्स या कंपनीच्या आवारात आधार ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने गुरुवार (दि. ३) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे होते.
या शिबिराचे उदघाटन कंपनीचे प्लांट डायरेक्टर संबित प्रहराज, फायनान्स डायरेक्टर व्ही. रामास्वामी, संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीचे अधिकारी राजेंद्र सेठिया, दीपक जाधव, सुधीर पोळ, टी. यु.सी. सी. महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी प्रमोद मोरे, शिवाजी सोनवणे, संजय सुर्वे, नामदेव भोपते, श्रीमंत शितोळे, माणिकराव सस्ते आदी उपस्थित होते.
या शिबिरात ९० जणांनी रक्तदान केले. संबित प्रहराज व संभाजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिन शितोळे, कमरअली लातूरवाला, अनिल भुजबळ, निलेश शिनलकर, अमित कांबळे, प्रशांत चौगुले, दीपक गोड, प्रवीण जाधव, सुनील याऊल, शैलेश वाघेरे, पंकज जुमळे, तुषार कदम आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद मोरे तर निलेश शिनलकर यांनी आभार मानले.











