न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- सॅडविक काॅलनी, दिघी-भोसरी रस्त्यावर एका शाळेच्या बसचा ऑइल टॅंक फुटल्याने रस्त्यावर मोठे ऑइल सांडले होते. या घटनेमुळे रस्त्यावर अपघाताची शक्यता हेरून व अपघात होऊ नये याकरीता नगरसेविका अनुराधा गोफणे यांनी प्रसंगावधान बाळगून अग्निशामक दलाला पाचारण केले.
अग्निशामक दल वेळेत पोहोचल्यानंतर गोफणे यांनी ऑइलने माखलेला रस्ता स्वच्छ करून व पूर्वरत करून घेतला. गोफणे यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे होणारी अपघात दुर्घटना टळली. त्यांच्या या कामाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.















