- म्हतारी मेल्याचे दुख नाही, परंतु, काळ सोकावण्याचा धोका ओळखुन, सरकारच्या या हिटरलशाहीचा धिक्कार!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बुधवार (दि. ९) रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध प़कल्पांचे उद्घाटन साय. ५ वा. होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील मुलभूत प्रश्नांची दखल घ्यावी, याकरीता माजी नगरसेवक भापकर हे घटनास्थळी आंदोलन करणार होते. परंतु, पोलिसांनी भापकर यांच्या निवास्थानी त्यांना स्थानबद्ध केले आहे. याबाबत भापकर यांनी प्रसिद्धीस पत्र दिले आहे.
भापकर यांनी यात म्हटले आहे की, या कार्यक्रमापासून काही अंतरावर सुरक्षित स्थळी मी व संघटनेचे पदाधिकारी शांततेने जनतेच्या विविध मुलभुत प्रश्नांबाबत धरणे आदोलन करणार होतो. काल मंगळवार (दि. ८.) रोजी आमच्या आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी चिंचवडगाव पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प़दिप लोंढे यांच्याकडे गेलो असता, आमचे निवेदन स्वीकारने ही कायदेशीर जबाबदारी लोढे यांनी टाळली व उलट सवाल करीत, तुम्ही पोलीस सह. आयुक्त मकरंद रानडे यांना भेटा, असे उध्दट उत्तर दिले.
आज बुधवार (दि. ९) रोजी सकाळी पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक अन्सार शेख व पोलिसांनी झोपेत असतानाच मला माझ्या राहत्या घरी नजरकैद करून ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस आयुक्त, सह. आयुक्त चिंचवड, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कृत्याने पून्हा एकदा लोकशाहीवर घाला घातला असून, म्हतारी मेल्याचे दुख नाही, परंतु, काळ सोकावण्याचा धोका ओळखुन, सरकारच्या या हिटरलशाहीचा धिक्कार झालाच पाहिजे. लोकशाही झिंदाबाद, असे या प्रसिद्धीपत्रकात भापकर यांनी म्हटले आहे.















