न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जाने.) :- ख्रिश्चन लिडर्स व पास्टर्स फेलोशिप, सीएलपीएफ या संघटनेच्या देहूरोड शहर अध्यक्षपदी गाॅड इज लव्ह मिनिस्ट्रीचे पास्टर रेव्ह. डाॅ. सुनिल साठे यांची निवड करण्यात आली आहे.
बिशप डेव्हिड भंडारे मेमोरियल फाऊंडेशन व देहूरोड ख्रिश्चन युथ असोसिएशनचे संस्थापक पास्टर अब्राहम भंडारे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले व अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
या पदाच्या माध्यमातून देहूरोड शहरातील ख्रिश्चन समाजासह सर्वांच्या हितासाठी, शांती, एकता, बंधूभाव निर्माण होण्यासाठी तसेच आध्यात्मिक उन्नती व समाजप्रबोधनाचे प्रभावी कार्य करणार असल्याचे, रेव्ह. डाॅ. सुनिल साठे यांनी सांगितले व आपली नियुक्ति केल्याबद्दल पास्टर अब्राहम भंडारे यांचे आभार मानले.











