- वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- अज्ञात चोरट्याने २४ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूम मधून सहा लाख १२ हजार २६६ रुपये किमतीचे २१९.५२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
ही घटना रिजेन्सी हेरिटेज, पार्क स्ट्रीट गेट जवळ, औंध-रावेत रोड येथे घडली. विवेक साहेबराव शिंदे (वय ४१, रा. रिजेन्सी हेरिटेज, पार्क स्ट्रीट गेट जवळ, औंध-रावेत रोड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ४) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.












