- मंदिरातील तीन दानपेट्या फोडल्या; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- अज्ञात चोरट्याने मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत चऱ्होलीमधील श्री वाघेश्वर महाराज मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील तीन दानपेट्यातील सुमारे ३० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.
तसेच मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केबल वायर तोडली. दानपेट्यांचे नुकसान केले. ज्ञानेश्वर विठ्ठल पठारे (वय 48, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












