- मिळकतकराचा भरणा करण्याकरिता पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- संपूर्ण थकबाकीसह मिळकतकराचा भरणा पहिल्या सहामाहीपर्यंत म्हणजे ३० जूनपर्यंत केल्यास मिळकतधारकांना सामान्यकरात सवलत दिली जाते. कोरोना संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे ही सवलत ३१ जुलैपर्यंत वाढविली होती.
या मुदतीला आणखी एका महिन्याची म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.
कोरोना संसर्गामुळे शहरातील बहुतांश दुकाने, व्यवसाय बंद आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजक, व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाच्या निर्बंधाचा विचार करून सामान्यकरात सवलत योजनेला दुसऱ्यांदा एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सवलत मिळकतधारकांसह दिव्यांग व महिलांना दिली आहे .